मुंबई : ‘दिल चाहता है’ या बहुचर्चित चित्रपटात काम करणारे अभिनेते रिओ कपाडिया यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. मुंबईत शुक्रवार दि. १५ सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रिओ यांनी आजवर मालिका आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. तसेच, त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील आमिर खान, शाहरुख खान यांच्यासोबत काम केले होते.
रिओ यांनी Amazon Prime या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या 'मेड इन हेवन २' या वेब मालिकेत शेवटचे काम केले. तर यापुर्वी २०२१ मध्ये रिओने 'द बिग बुल'मध्ये अभिषेक बच्चनसोबत प्रमुख भूमिका साकारली होती.
या शिवाय 'हॅपी न्यू इयर', 'मर्दानी', 'प्रधानमंत्री', 'हम हैं राही कर के', 'श्री', 'एक अनहोनी', 'मुंबई मेरी जान', 'मुंबई मेरी जान' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होके. स्टार प्लसवरील लोकप्रिय ऐतिहासिक मालिका 'महाभारत'मध्ये त्यांनी पांडूची भूमिका साकारली होती. तर 'सपने सुहाने लडकपन के'मधूनही रिओयांनी बरीच लोकप्रियता मिळवली होती.