मुंबई : शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी राज्य विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. एकाच दिवशी सर्व 54 आमदारांची सुनावणी होईल. या सुनावणीसाठी शिवसेनेतल्या शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना हजर राहावं लागणार आहे. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांसमोर तब्बल 34 याचिकांवर सुनावणी होईल. या सुनावणीत वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करून आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली होती.
या १६ आमदार अपात्र प्रकरणासोबत ३४ याचिकांवर विधानभवनात सुनावणी सुरू आहे. दरम्यान सर्व याचिकांवर एकदाच सुनावणी घ्या, अशी मागणी ठाकरे गटाच्या वकीलांनी केली होती. तर दोन आठवड्यांचा अवधी द्या , अशी मागणी शिंदे गटाने केली. मात्र यावर राहुल नार्वेकर यांनी सर्व याचिका स्वतंत्र आहेत. त्यामुळे सुनावणी ही स्वतंत्र होणार असल्याचे सांगितले.
मात्र आता सुनिल प्रभूंनी दाखल केलेले कागदपत्र आम्हाला मिळावीत, अशी मागणी शिंदे गटाचे वकील अनिल सिंग यांनी केली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाला २ आठवड्यांचा वेळ देण्यात आलेला आहे. दोन्ही गटांना एकमेंकांची कागदपत्र मिळावीत यासाठी हा २ आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे लेखी उत्तर सादर करण्यासाठी शिंदे गटाला मुदत मिळाली आहे.
दरम्यान सर्व याचिकांवर एकदाच सुनावणी घ्या, अशी मागणी ठाकरे गटाच्या वकीलांनी केली होती. तर दोन आठवड्यांचा अवधी द्या,अशी मागणी शिंदे गटाने केली. मात्र यावर राहुल नार्वेकर यांनी सर्व याचिका स्वतंत्र आहेत. त्यामुळे सुनावणी ही स्वतंत्र होणार असल्याचे सांगितले.