पंतप्रधान मोदींची मध्य प्रदेशला ५०,००० कोटींची भेट
14-Sep-2023
Total Views |
भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. १४ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील बिना येथे पोहोचले. तेथे बीना रिफायनरी येथील 'पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स' आणि राज्यभरातील १० नवीन औद्योगिक प्रकल्पांसह ५०,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांसाठी पंतप्रधानांनी रिमोटचे बटण दाबून अनावरण केले. पीएम मोदी म्हणाले की, अहंकारी I.N.D.I. युतीला सनातनला संपवायचे आहे.
विरोधी आघाडीला सनातन धर्म नष्ट करायचा
बीनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “देशात असे पक्ष आहेत जे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांची एकत्र टीम म्हणजे I.N.D.I आघाडी आहे. काही लोक याला अहंकारी युती देखील म्हणतात. त्यामुळेच त्यांचा नेता ठरलेला नाही. नेतृत्वाबाबत संभ्रम आहे, मात्र त्यांनी मुंबईतील बैठकीत आपले धोरण आणि रणनीती ठरवली आहे.
पंतप्रधान म्हणाले, “भारताच्या संस्कृतीवर हल्ला करणे हे त्यांचे धोरण आहे. I.N.D.I. युतीची रणनीती भारताच्या संस्कृतीवर आणि श्रद्धांवर आघात करणे आहे. I.N.D.I. हजारो वर्षांपासून भारताला एकसंध ठेवणाऱ्या विचार, मूल्ये आणि परंपरा नष्ट करणे हा युतीचा हेतू आहे...”
पीएम मोदी म्हणाले, “पीएम मोदी बीनामध्ये म्हणाले, “ज्या सनातनवर गांधीजींनी आयुष्यभर विश्वास ठेवला, प्रभू श्री राम ज्यांनी त्यांना आयुष्यभर प्रेरणा दिली. त्यांचे शेवटचे शब्द होते - हे राम. ज्या सनातनने त्यांना अस्पृश्यतेविरुद्ध आंदोलन करण्यास प्रेरित केले. हा I.N.D.I. युतीचे लोक, युतीच्या या अहंकारी लोकांना ती सनातन परंपरा संपवायची आहे.
पंतप्रधान म्हणाले, “ही I.N.D.I. आघाडी ‘सनातन धर्म’ नष्ट करू इच्छित आहे. आज त्यांनी सनातनला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. उद्या ते आमच्यावर हल्ले करतील. देशभरातील सर्व ‘सनातनी’ आणि आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या लोकांनी सावध राहावे. अशा लोकांना थांबवायला हवं..."
पंतप्रधान पुढे म्हणाले, “सनातनच्या प्रेरणेने, स्वामी विवेकानंदांनी समाजातील विविध दुष्कृत्यांबद्दल लोकांना जागृत केले, सनातनच्या प्रेरणेने लोकमान्य टिळकांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी पुढाकार घेतला, गणेशपूजेला स्वातंत्र्य चळवळीशी जोडले, सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा निर्माण केली. आज ही I.N.D.I. युतीला विनाश घडवायचा आहे.”
पंतप्रधान म्हणाले, “आम्ही मध्य प्रदेशला भयमुक्त केले. कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली. काँग्रेसने बुंदेलखंडला कसे पाण्यासाठी व्याकुळ केले होते,हे लोकांच्या लक्षात असेल. आजच्या सरकारच्या काळात प्रत्येक घरात रस्ते आणि वीज पोहोचत आहे... आज मोठ्या गुंतवणूकदारांना मध्य प्रदेशात येऊन नवीन कारखाने काढायचे आहेत. मध्य प्रदेश पुढील काही वर्षांत औद्योगिक विकासाच्या नव्या उंचीला स्पर्श करणार आहे.
जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “या प्रकल्पांमुळे या प्रदेशाच्या औद्योगिक विकासाला ऊर्जा मिळेल. या प्रकल्पांवर केंद्र सरकार ५०,००० कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहे. जरा कल्पना करा, आपल्या देशातील अनेक राज्यांच्या एकूण बजेटमध्ये भारत सरकार आज एका कार्यक्रमासाठी जेवढा पैसा खर्च करत आहे तेवढा पैसाही नाही.”