सन फार्मा तील २ टक्यांचे भागभांडवल एलआयसी ने 'इतक्याला' विकले
एलआयसी ने ९७३.८० रुपये प्रति शेअर मूल्याने शेअर्स विकले.आपला 2% हिस्सा खुल्या बाजार विक्रीद्वारे 4,699 कोटी रुपयांना विकला.
नवी दिल्ली: एलआयसीने गुरुवारी जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी सन फार्मामधील आपला 2% हिस्सा खुल्या बाजार विक्रीद्वारे 4,699 कोटी रुपयांना विकला आहे.शेअर विक्रीनंतर 22 जुलै 2022 ते 13 सप्टेंबर 2023 या कालावधीत होल्डिंगमध्ये 2 टक्क्यांची घट झाली आहे.सन फार्मा ब्रँडेड आणि जेनेरिक फॉर्म्युलेशन्स आणि अॅक्टिव्ह फार्मा इन्ग्रीडिएंट्स (एपीएल) च्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन, विकास आणि विपणन व्यवसायात गुंतलेली आहे.देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी एलआयसीचा शेअर बीएसईवर ०.२७ टक्क्यांनी वधारून ६६०.८० रुपयांवर बंद झाला. सन फार्माचा शेअर ०.८ टक्क्यांनी वधारून १,१४३.६० रुपयांवर बंद झाला.