वाहनांच्या विक्रेत्यांनीही स्क्रॅप सुविधा उपलब्धतेसाठी प्रयत्न करावे - नितीन गडकरी

14 Sep 2023 14:52:11
Gadkari
 
 
वाहनांच्या विक्रेत्यांनीही स्क्रॅप सुविधा उपलब्धतेसाठी प्रयत्न करावे - नितीन गडकरी
 

नवी दिल्ली: Fifth Auto Retail Conclave मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑटोमोबाइल क्षेत्रावर बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.सरकार या क्षेत्रातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.येणाऱ्या काळात वाहनांच्या विक्रेत्या एजन्सी डीलर्सला जुनी वाहने स्क्रॅप करण्याची परवानगी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. '
 
 
भारत हा बायोफ्युएल, व पर्यायी इंधनाचा वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत आहे.भारत हा ग्रीन हायड्रोजनचा नंबर १ उत्पादक बनवण्यासाठी सरकार काम करत असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले.
 
 
यापुढे बोलताना गडकरी म्हणाले, 'भारत हा ऑटोमोबाइल क्षेत्राचे मुख्य केंद्र व्हावे अशी माझी इच्छा आहे ‌'.भारत प्रवासी वाहन क्षेत्रात क्रमांक ४ चा उत्पादक राष्ट्र आहे. व व्यावसायिक वाहनांच्या उत्पादनासाठी भारत सहाव्या क्रमांकावर असल्याचे गडकरी म्हणाले.
 
Powered By Sangraha 9.0