मुंबई : 'इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई अंतर्गत रिक्त पदासाठी अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून 'व्यवस्थापकीय संचालक' या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पध्दतीने करवयाचा असून आयपीआरसीएलच्या कार्यालयात पोस्टाद्वारे पाठवायचा आहे.
दरम्यान, अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत भरतीविषयक जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत उमेदवारास अर्ज करावा लागेल. कंपनी सचिव, आपीआरसीएल, चौथा मजला, निर्माण भवन, एम. पी. रोड, माझगाव (पूर्व) मुंबई- ४०००१०.