नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजस्थान दौऱ्यावेळी पुष्कर येथील जगातील एकमेव ब्रह्मदेवाच्या मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशभरातील प्रत्येक व्यक्तीस इच्छा होते की, आपण इथे यावं आणि जगातील एकमेव ब्रह्मदेवाच्या मंदिराचं दर्शन घ्यावं. तसेच, मी स्वतःला नशीबवान समजतो की, मला ब्रह्मदेवाचे आशीर्वाद मिळाला, असे फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ब्रह्मदेवाचा आशीर्वाद असून राजस्थानातील भाजपलादेखील मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. दरम्यान, राजस्थानातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील परिवर्तन यात्रेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील.