AIIMS Bilaspur Recruitment 2023 : 'या' पदाकरिता अर्जप्रक्रिया सुरू

14 Sep 2023 16:50:55
AIIMS Bilaspur Recruitment 2023

मुंबई :
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, बिलासपूर, हिमाचल प्रदेश येथे भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एम्स बिलासपू मधील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. तसेच, या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरतीच्या माध्यमातून एम्स बिलासपूर मधील विविध पदांसाठीच्या एकूण ६२ जागा या ग्रुप 'अ' आणि ग्रुप 'ब' यासंवर्गातील रिक्त पदे थेट भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. उमेदवारांसाठी अर्जप्रक्रिया दि. ०५ सप्टेंबर २०२३ पासून सुरू झाली असून दि. ०४ ऑक्टोबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे.

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क आकारण्यात येणार असून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०० रुपये अर्जशुल्क आकारले जाईल तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १२०० रुपये अर्जशुल्क आकारण्यात येणार आहे. भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

AIIMS Bilaspur Recruitment 2023


Powered By Sangraha 9.0