गोंदियात कॉमन क्रेनची तस्करी करणाऱ्या ५ जणांना अटक

13 Sep 2023 19:14:55
 



Saras smuggling




मुंबई (विशेष प्रतिनिधी): गोंदिया जिल्ह्यात पेट्रोलिंग करत असताना वनअधिकाऱ्यांनी दुर्मिळ कॉमन क्रेन या पक्ष्यांची तस्करी करणाऱ्या ५ जणांना अटक केली आहे. सोमवार दि. १२ सप्टेंबर रोजी गस्त घालत असताना गोंदिया जिल्ह्यातील महामार्गावर असलेल्या दोन संशयास्पद वाहनांची चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे.

वन्यजीव कायद्यांतर्गत संरक्षित व दुर्मिळ प्रजात असलेले कॉमन क्रेन या पक्ष्यांची अवैधरित्या या वाहनांमधून तस्करी केली जात होती. समीर मन्सुरी, हजरुद्दीन मौलवी, मुसा शेख, शहजाद शेख, आणि पठाण हुसेन अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. यांच्याकडे असलेल्या इन्होवा आणि ब्रीझा या दोन गाड्यांमधून ही तस्करी केली जात होती. गस्त घालत असताना वनअधिकाऱ्यांना संशयास्पद वाटल्यामुळे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.



Saras smuggling


कलकत्ता ते मुंबई हे तस्कर प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात आरोपी, त्यांची दोन वाहने आणि ५ जीवंत कॉमन क्रेन वनविभागाने ताब्यात घेतले आहे. अतिशय दुर्मिळ आणि संकटग्रस्त असलेली ही प्रजात असल्यामुळे संबंधित आरोपिंना वन्यजीव कायद्यांतर्गत शिक्षेची तरतुद आहे. 



Powered By Sangraha 9.0