ठाणे मनपा क्षेत्रात भाजपचे १२ शिलेदार सज्ज

भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुलेंकडून १२ मंडल अध्यक्षांची नियुक्ती

    13-Sep-2023
Total Views |

bjp

ठाणे : भाजपा ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय वाघुले यांनी भाजपामध्ये संघटनात्मक दृष्टीने महत्वाच्या असलेल्या १२ मंडल अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. भाजपाच्या खोपट येथील मुख्य कार्यालयात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि संजय वाघुले यांच्या हस्ते नवनियुक्त मंडल अध्यक्षांना नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.


ओवळा-माजिवडा मंडल अध्यक्षपदी हेमंत म्हात्रे, वर्तकनगरमध्ये संतोष जायसवाल, लोकमान्यनगरमध्ये निलेश रामचंद्र पाटील, राबोडी, वृंदावन, खोपट परिसराचा समावेश असलेल्या मध्य मंडलात दिलीप कंकाळे, नौपाडा मंडलात विकास घांग्रेकर, इंदिरानगरमध्ये दयाशंकर यादव, वागळे इस्टेटमध्ये सचिन सावंत, कोपरीत शिवाजी रासकर, कळवा येथे अॅड. सुदर्शन साळवी, मुंब्रा येथे कुणाल बाबजी पाटील, दिवा येथे सचिन रमेश भोईर, कौसा येथे सोहेल जुल्फीकार यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपाला संघटनात्मकदृष्ट्या मजबूत करण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोचवाव्यात, असे आवाहन आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी केले.
 
 
आगामी काळातील लोकसभा निवडणुकीबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मंडल अध्यक्षांनी स्थानिक पातळीवर भाजपाची संघटना मजबूत करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेला सेवा पंधरवडा व आरोग्य क्षेत्रात क्रांतीकारी ठरणाऱ्या आयुष्मान भव मोहीमेच्या यशस्विततेसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन अध्यक्ष संजय वाघुले यांनी केले. या वेळी सरचिटणीस मनोहर सुखदरे, सचिन पाटील, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरज दळवी यांच्यासह उपाध्यक्ष, चिटणीस आणि विविध मोर्चा-सेलचे प्रकोष्ट यांची उपस्थिती होती.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.