मुंबई : 'एसजेव्हीएन लिमिटेड' अंतर्गत नोकरीची संधी निर्माण झाली आहे. एसजेव्हीएन लिमिटेड, भारत सरकार आणि हिमाचल प्रदेश सरकार यांच्या संयुक्तरीत्या प्रकल्पामध्ये रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून एसजेव्हीएन लिमिटेडमधील एकूण २९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
दरम्यान, एसजेव्हीएन लिमिटेडमधील फिल्ड इंजिनीयर(इलेक्ट्रिकल/सिव्हिल), फिल्ड इंजिनीयर (ऑफिशियल लँग्वेज) अशा विविध पदांसाठी उमेदवारांनी अर्ज करावयाचा असून दि. १५ ऑक्टोबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे. अधिक माहितासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.