रानिल विक्रमसिंघेंच्या गुगलीने ममतादीदींची पडली विकेट?

    13-Sep-2023
Total Views |
Mamata Banerjee Meets Ranil Wickremesinghe

कोलकत्ता
: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दि. १३ सप्टेंबर रोजी दुबई विमानतळावर श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली आणि त्यांना नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या स्टेट बिजनेस समिटसाठी आमंत्रित केले. दरम्यान इंडिया आघाडीचं नेतृत्त्व करणार का? असा प्रश्न विक्रमसिंघे यांनी विचारले असता. ममतादीदींनी उत्तर टाळण्याचा प्रयत्न केला. यावरून विरोधकांच नेतृत्त्व कोण करणार? आणि हीच विरोधकांची एकजूट आहे का? असा सवाल अनेकांनी विचारला.

घडलं असे की, रानिल विक्रमसिंघे यांनी ममता बॅनर्जी यांना विचारले की, त्या विरोधी आघाडीचे (इंडिया)चे नेतृत्व करणार आहेत का? यावर बॅनर्जी यांनी हसत हसत उत्तर दिले, "हे लोकांच्या आणि विरोधकांच्या वृत्तीवर अवलंबून आहे."

दरम्यान दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी दुबई विमानतळावर दोन्ही नेत्यांची अचानक भेट झाली. विक्रमसिंघे यांच्याशी झालेल्या भेटीबाबत मुख्यमंत्री म्हणाले, "त्यांनी मला दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लाउंजमध्ये पाहिले आणि काही चर्चेसाठी मला बोलावले."

विक्रमसिंघे यांना बंगाल ग्लोबल बिझनेस समिटसाठी आमंत्रित केले."त्यांच्या शुभेच्छांमुळे मला आनंद झाला आहे आणि मी त्यांना कोलकाता येथे होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिट २०२३ मध्ये आमंत्रित केले आहे," मुख्यमंत्री ममतांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आणि त्यांच्या पोस्टसह मुख्यमंत्र्यांनी बैठकीचा फोटो देखील शेअर केला आहे.

ममतादीदी दुबई आणि स्पेनच्या दौऱ्यावर

दरम्यान ममता बॅनर्जी या १२ दिवसांच्या दुबई आणि स्पेन दौऱ्यावर आहेत. त्या दि. १२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी दुबईला पोहोचल्या आणि स्पेनला जाणार्‍या विमानात बसण्यासाठी विमानतळावर होत्या. मैड्रिडमध्ये तीन दिवसीय बिझनेस समिटमध्ये मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. यावर्षी बंगाल ग्लोबल बिझनेस समिट २१-२२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.