नवी दिल्ली : विरोधकांच्या I.N.D.I.A. आघाडीच्या समन्वय समितीची बैठक दिल्लीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी होत आहे. विरोधी पक्ष आघाडीने आतापर्यंत तीन बैठका घेतल्या आहेत, मात्र अद्याप जागावाटपावर एकमत झालेले नाही. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होईल असे वाटत असताना, जागावाटपाचा निर्णय राज्यस्तरावर होणार असल्याची माहिती सूत्रांकडुन मिळते आहे.
या बैठकीत विशेष अधिवेशनासाठी रणनीतीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे. गणेशोत्सवानंतर इंडिया आघाडीच्या देशभर सभा घेतल्या जाणार आहेत. विरोधी आघाडी I.N.D.I.A. ने पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.