हंसल मेहता यांची ‘स्कूप’ बुसानच्या ग्लोबल ओटीटी पुरस्कारांमध्ये दाखल

    13-Sep-2023
Total Views |
 
मुंबई :  हंसल मेहता यांची नेटफ्लिक्स वरील वेब मालिका म्हणजे 'स्कूप'. 
सत्य घटनेवर आधारित असलेल्या या वेब मालिकेला २०२३ चा आशियायी कंटेंट अवॉर्ड्स आणि ग्लोबल ओटीटी अवॉर्ड्ससाठी नामांकने मिळाली आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हे नामांकन ओटीटी प्लॅटफॉर्म स्ट्रीमिंग मनोरंजनाच्या जगात उल्लेखनीय म्हणून ओळखले जाते. तसेच,  अभिनेत्री करिश्मा तन्ना हिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ या प्रमुख श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. तर, ‘स्कुप’ या वेब मालिकेला ‘सर्वोत्कृष्ट आशियाई मालिका’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. 

‘स्कूप’ मध्ये करिश्मा तन्नाने मुंबईतील एका वृत्तपत्रासाठी काम करणारी प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर जागृती पाठकची भूमिका साकारली आहे. तिचा प्रतिस्पर्धी जयदेब सेन यांच्या हत्येचा आरोप तिच्यावर केला जातो. आणि ही कथा पुढे जाते. दरम्यान, हंसल मेहता यांची नुकतीच नवी वेब मालिका 
‘स्कॅम २००३ - द तेलगी स्टोरी’ सोनी लिव्हवर प्रदर्शित झाली आहे.