मुंबई : दादर स्टेशनमधील प्लॅटफॉर्म एकची रुंदी वाढवण्यात येणार आहे. अशावेळी गर्दीचं नियोजन करण्यासाठी दादर लोकलच्या ११ फेऱ्या परळपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दादर हे सर्वात गर्दीचं स्टेशन असल्यामुळे आणि १५ सप्टेंबरपासून प्लॅ़टफॉर्मची उंची वाढवण्याचं काम सुरू होणार असल्याने १५ सप्टेंबरपासूनच दादर लोकल परळपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक एकची लांबी २७० मीटर आणि रुंदी ७ मीटर आहे. आता ही रुंदी साडेदहा मीटर केली जाणार आहे. पुढील दोन महिन्यांत प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.