अल्पवयीन मुलाला अमिष दाखवून रचला धर्मांतराचा डाव!

"बजरंग दल"चे चर्चबाहेर निदर्शने!

    13-Sep-2023
Total Views |
Church priest in Kanpur lured minor Hindu to become Christian

लखनऊ : उत्तर प्रदेशातील कानपूर येथील चर्चमध्ये धर्मांतराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चर्चबाहेर एकच गोंधळ घातला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही बाजूने एकमेकांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. ही घटना दि. १० सप्टेंबर रोजी घडली.

हे प्रकरण कानपूर नगर जिल्ह्यातील स्वरूपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. दि.१० सप्टेंबर रोजी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीत पीडितेने म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी तिला चर्चमधून ख्रिश्चन बनण्याचे आमिष दाखवण्यात आले. हे आमिष चर्चचे धर्मगुरू आनंद डॅनियल यांनी दिले होते.




एका अल्पवयीन पीडित ख्रिस्ती झाल्यास ५० हजार रुपयांचे आमिष दाखविल्याचा डॅनियलवर आरोप आहे. यासोबतच संपूर्ण कुटुंबाने धर्मांतर केल्यास त्यांना घर देण्यात येईल, असेही सांगण्यात आले. पीडितेने वारंवार नकार देऊनही आनंद डॅनियल तिच्यावर सतत दबाव टाकत होता, असेही तक्रारीच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे.
 
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बजरंग दलाचे पदाधिकारी चर्चबाहेर पोहोचले. त्यांनी आरोपी पाद्रीला अटक करण्याची मागणी सुरू केली. बजरंग दलाचे पदाधिकारी कृष्णा तिवारी यांनी या प्रकरणी सांगितले की, चर्चमधून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.



 
तिवारी यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पाद्रीला संरक्षण दिल्याचा आरोपही केला आहे. बजरंग दलाची टीम आणि पोलिसांची टीम जेव्हा चर्चमध्ये पोहोचली तेव्हा आनंद डॅनियल वारंवार फोन काढून घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.
 
तिवारीच्या म्हणण्यानुसार, आरोपी आनंद डॅनियल २००८ साली दक्षिण भारताच्या काही भागातून आला. मग त्याने हळूहळू एका घराचे चर्चमध्ये रूपांतर केले. कृष्णा तिवारी यांनी सांगितले की, त्यांनी चर्च रजिस्टर पाहिल्यावर त्यात प्रार्थनेसाठी आलेल्या अनेक हिंदूंची नावे नोंदवली होती.
 
बेकायदेशीर धर्मांतरात चर्च आणि धर्मगुरूंचा सहभाग असल्याचा आरोप करत तिवारी यांनी कारवाईच्या मागणीसाठी जनतेला सहकार्य करण्याचे आवाहनही केले. या तक्रारीवरून कानपूर नगर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एसएचओ स्वरूप नगर यांना चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. एसीपीच्या म्हणण्यानुसार, दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या असून त्यावर तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.मात्र उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्मांतरणाच्या कलम ३/५ (१) अंतर्गत आरोपी पाद्रीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.