'अॅपल' युझर्ससाठी खुशखबर! 'iPhone 15 Pro' आणि 'iPhone 15 Pro Max' नव्या फीचर्ससह लाँच

    13-Sep-2023
Total Views |
Apple Users Can Buy iPhone 15 Pro And iPhone 15 Pro Max

मुंबई :
समस्त मोबाईल फोन विश्वात एकाच कंपनीचा डंका पाहायला मिळतो, तो म्हणजे जगविख्यात 'Apple'. याच अॅपल कंपनीने आजवर अनेक नवनवीन फिचर्स असलेले स्मार्टफोन्स बाजारात आणले आहेत. दरम्यान, 'Apple'ने 'iPhone 15 Pro' आणि 'iPhone 15 Pro Max' चे अनावरण केले आहे. या मोबाईल फोन्समध्ये अपडेटेड असे गेमिंगसाठी नवीन कंटूर्ड एज, नवीन अॅक्शन बटण, शक्तिशाली कॅमेरा अपग्रेड आणि 'A17' प्रो सह मजबूत आणि हलके टायटॅनियम डिझाइन वापरण्यात आले आहे.

दरम्यान, 'iPhone 15' मालिकेतील तुमच्या चार्जिंगच्या समस्यांसाठी Type-C पोर्ट वापरता येणार आहे. यामुळे सर्व मॉडेल्स USB‑C कनेक्टर वापरुन चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफर करण्यासाठी उपयुक्त ठरेल. ऍपलचे वर्ल्डवाइड मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रेग जोसविक म्हणाले, “आम्ही तयार केलेली ही सर्वात प्रो लाइनअप आहे, अत्याधुनिक टायटॅनियम डिझाइनसह, गेम बदलणारे नवीन वर्कफ्लो सक्षम करणारी आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट आयफोन कॅमेरा प्रणाली आणि नवीन अध्याय सुरू करणारी A17 प्रो चिप आहे. त्यामुळे आमच्या ग्राहकांना आयफोनवर याआधी कधीही न पाहिलेले परफॉर्मन्स आणि गेम्सचे नवे फिचर्स पाहायला मिळणार आहे.


तसेच, "iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max आमच्या वापरकर्त्यांच्या दैनंदिन अनुभवांना समृद्ध करण्यात मदत करण्यासाठी ऍपल डिझाइन आणि उद्योगातील प्रथम नवकल्पनांचे सर्वोत्कृष्ट प्रतिनिधित्व करतात आणि त्यांना त्यांची सर्जनशीलता दाखवण्यास सक्षम करतात.", असे अॅपल कंपनीच्या वरिष्ठांचे म्हणणे आहे.

'iPhone 15 Pro' आणि 'iPhone 15 Pro Max'मधील नवे फीचर्स

या नव्या फोनमध्ये वापरकर्त्यांस उत्तम कॅमेरा क्वालिटी मिळणार आहे. त्याचबरोबर, यामध्ये असणाऱ्या ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा ज्यामुळे कमी प्रकाशातील फोटो काढण्याचे फिचर मिळणार आहे. तसेच यात तुम्हाला 3X टेलीफोटो लेन्स आणि 5X ऑप्टिकल झूम फिचर मिळणार आहे. १२मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेन्ससह वापरकर्त्यांना मॅक्रोकामेरा देखील मिळणार आहे. त्याचबरोबर, कंपनीने कंपनीने आयफोन १५ प्रो मॉडेल्समध्ये अ‍ॅक्शन बटण दिले असून त्याच्या मदतीने अनेक कामे करता येणार आहेत.

२०३० पर्यंत कार्बनमुक्त प्रॉडक्ट्स तयार करणार

२०३० पर्यंत कंपनीची झिरो न्यूट्रल प्रॉडक्ट्स तयार करणार असल्याचे सीईओ टीम कूक म्हणाले. सिरीज आय वॉच मध्ये शून्य कार्बन उत्सर्जनाची संकल्पना अंगिकारण्यात आली आहे. यात सर्व साहित्य पुनर्वापर करुन वापरले आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.