अजितदादा गटाला ट्विटरने दिला दणका!

13 Sep 2023 11:55:54

Ajit Pawar 
 
 
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ट्विटरने दणका दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार गटाकडून ट्विटरचे एक नवीन अकाऊंट NCPspeaks_official असे तयार करण्यात आले होते. हे राष्ट्रवादीचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. ट्विटरचे नियम न पाळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अजितदादा गटाला मोठा धक्का बसला आहे.
 
 
twitter
 
अनेक जणांनी या अकाऊंटला विविध ट्विटमधून टॅग देखील केले होते. मात्र हे अकाऊंट आता ट्विटरने सस्पेंड केलं आहे. शरद पवार गटाकडून या ट्विटर हँडलवर दावा केल्यानंतर आणि तक्रारीनंतर ते निलंबित करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर अजित पवार गटाने ट्विटरला मेल केला आहे. तर दुसरीकडे, शरद पवार गटाचे ट्विटर अकाऊंट @NCPSpeaks हे ॲक्टिव आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0