मुंबई: विरोधकांच्या I.N.D.I.A. आघाडीच्या समन्वय समितीची उद्या (१३ सप्टें.) बैठक होणार असून दिल्लीतल्या शरद पवारांच्या घरी ही बैठक होणार आहे. विरोधी पक्ष आघाडीने आतापर्यंत तीन बैठका घेतल्या आहेत, मात्र अद्यापपर्यंत जागावाटपावर एकमत झालेले नाही. आता याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. जागावाटपाबाबत भारतीय आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक शरद पवार यांच्या घरी होत आहे.
विरोधी आघाडी I.N.D.I.A. ने पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत आणि लोगोबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते. तसेच पाच शहरात रॅली काढण्याबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
समन्वय समितीचे सदस्य :
- केसी वेणू गोपाल
- शरद पवार
- टीआर बालू
- संजय राऊत
- तेजस्वी यादव
- अभिषेक बॅनर्जी
- राघव चढा
- जावेद अली खान
- लल्लनसिंह
- हेमंत सोरेन
- डी राजा
- ओमर अब्दुल्ला
- मेहबूबा मुफ्ती