आरबीआय व बँका डिजिटल करन्सीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन फिचर्स आणणार : सुत्र

    12-Sep-2023
Total Views |
Digi
 
 
 
आरबीआय व बँका डिजिटल करन्सीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन फिचर्स आणणार : सुत्र
 
 
मुंबई:रिझर्व्ह बँक इतर बँका, व सुविधा पुरवणाऱ्या वित्तीय संस्थांसोबत डिजिटल करन्सी साठी पुढाकार घेत काम करत आहे.सेंट्रल बँकेची ( CBDC) सेंट्रल बँक डिजीटल करन्सीला लोकप्रिय बनवण्यासाठी ही महत्वाकांक्षी योजना असेल.असे रॉयटर्स वृत्तसंस्थेला सेंट्रल बँकेच्या सुत्रांनी माहिती दिली आहे.
 
 
 
इ रुपी ( CBDC) ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विशेष पुश करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत असतानाच रिटेल सीबीडीसी व्यवहार प्रती दिवशी १८००० पर्यंत पोहोचले आहेत.२०२४ पर्यंत आरबीआयचे एक मिलियन CBDC व्यवहाराचे लक्ष आहे.
 
 
 
इ रुपी भारताच्या युपीआय इंटरफेसला जोडण्याचा व ऑफलाइन असताना व्यवहार करणे शक्य होईल का अशी फिचर्स अंतर्भूत होऊ शकतात.असे सुत्रांकडून सांगण्यात आले.आरबीआयने QR कोडचा मार्फत इ रुपी चा वापर करण्यावर बँकाना सूचित केले असल्याचे सांगितले आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.