मुंबई: ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वर्णावरुन टीका केली. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भास्कर जाधवांना प्रत्युत्तर दिले आहे. भास्कर जाधवांना कोकणात सोंगाड्या म्हणतात. असं नितेश राणे म्हणाले आहेत.
भास्कर जाधवांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, "यांना जर डुक्कराच्या बाजुला उभे केले तर डुक्कर ही म्हणेल, भास्कर जाधवांपेक्षा मी चांगला दिसतो. कोकणात भास्कर जाधवांना सोंगाड्या म्हणतात. जो वेगवेगळी सोंगं घेतो. हाच भास्कर जाधव याने आदित्य ठाकरेंना बायल्या म्हटलं होतं. उद्धव ठाकरे किती नालायक आहेत, ते भास्कर जाधवांनीच सांगितलं आहे. म्हणुन याला सोंगाड्या म्हणतात. पुन्हा जर बावनकुळेंवर काही टीका केली तर महाराष्ट्रात फिरु देणार नाही." असा इशाराच राणेंनी दिला आहे.