लव्ह जिहाद व्हाया धर्मांतर; सद्दाम हुसैनचे पितळ उघडं!

12 Sep 2023 11:45:54
Love Jihad accused Saddam Hussain trapped victims

रांची : सोशल मीडियावर प्रेमाचे आमिष दाखवून महिलांचे शोषण करणाऱ्या सद्दाम हुसैन याला झारखंडच्या गिरिडीह पोलिसांनी अटक केली आहे. अटकेदरम्यान सद्दाम एका महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध कोलकात्याला ट्रेनमध्ये घेऊन जात होता. पीडितेची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दि.१० सप्टेंबर रोजी आरोपीला अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. आत्तापर्यंत सद्दामने अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. सद्दाम मुलींना धर्मांतरासाठी भाग पाडून वेगवेगळ्या शहरात विकत असे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सद्दाम हा गिरडीहच्या गाओना पोलीस स्टेशन हद्दीतील बदीदिहचा रहिवासी आहे. निमियाघाट परिसरातील एका पीडितेने ९ सप्टेंबर २०२३ रोजी गिरिडीहच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडितेने तक्रारीत म्हटले होते की, सद्दाम हुसैन हा विवाहित असून त्याला मुले आहेत, तो सोशल मीडियावर स्वत:ला बॅचलर असल्याचे सांगतो. तो बनावट प्रोफाइल तयार करतो आणि मुलींना आपल्या तावडीत अडकवण्याचा प्रयत्न करतो. या सापळ्यात अडकल्याचे पीडितेने सांगितले. सद्दामच्या बोलण्याने ती प्रभावित झाली. सद्दामने पीडितेला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते आणि तिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ती आली.
 
येथे सद्दामने पीडितेच्या कपाळावर जबरदस्तीने सिंदूर भरल्याचा आरोप आहे. नंतर त्याने महिलेवर बलात्कार केला आणि यादरम्यान आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवले. या छायाचित्रांच्या मदतीने सद्दामने तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी तो पीडितेला कोलकाता येथे घेऊन जाण्याचा हट्ट करू लागला. महिलेने याला विरोध केल्यावर तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याचीच नव्हे तर तिचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकीही देण्यात त्यांने दिली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, सद्दामच्या धमक्यांमध्ये पीडितेच्या कुटुंबातील इतर महिलांवर बलात्कार करण्याचाही समावेश होता.
 
सद्दामच्या धमक्यांना कंटाळून आणि कोलकाता येथे जाण्यास भाग पाडल्याने पीडितेने गिरिडीह येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही बाब गिरडीहचे पोलिस अधीक्षक दीपक शर्मा यांनाही कळवण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली. आणि महिलेचा शोध सुरू केला. अखेर पारसनाथ रेल्वे स्थानकात पीडित महिलेला आरोपीच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. पीडितेसोबत असलेल्या सद्दामला अटक करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत सद्दामचा मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. यापूर्वीही त्याने अनेक मुलींना शिकार बनवले होते. आरोपींनी आधी मुलींना धर्मांतरासाठी भाग पाडले आणि नंतर वेगवेगळ्या शहरात विकल्याचा दावा केला जात आहे.
 
वृत्तसंस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सद्दाम हुसेनने पीडितेप्रमाणे यापूर्वीही अनेक महिलांशी विवाह केले आहेत. सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याबरोबरच त्याच्यावर यापूर्वीच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वीही त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. पण इतके करून ही त्याने गुन्हे करणे थांबवले नाही. गिरडीहचे पोलीस अधीक्षक दीपक कुमार शर्मा यांनी सद्दाम किंवा त्याच्यासारख्या कोणाकडूनही छळ झालेल्या महिलांनी पोलिसांशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या समस्या सांगण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियाचा वापर करताना सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.



Powered By Sangraha 9.0