मोदी सरकारचे मोठे पाऊल : TRAI अप्रत्यक्ष खाजगी क्षेत्राकडे

12 Sep 2023 12:20:42
TRAI
 
 
मोदी सरकारचे मोठे पाऊल : TRAI अप्रत्यक्ष खाजगी क्षेत्राकडे
 
TRAI चा नवा अध्यक्ष खाजगी क्षेत्रातील असणार 
 
मुंबई :TRAI ( Telecom Regulartory Authority of India) देशातील दूरसंचार व टेलिकॉमचे नियामक मंडळाच्या नियमावलीत सुधारणा होणार असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेस ने दिले आहे. या वृत्तानुसार TRAI चे अध्यक्षपद खासगी क्षेत्रातील व्यक्तीला देण्यात येणार आहे. टेलिकॉम विश्वातील हा मोठा बदल मानला जात आहे.
 
टेलिकॉमचा TRAI Act  मधील कलम ४ मध्ये नवीन तरतूद होणार आहे.यानुसार टेलिकॉमचे व टेलिकम्युनिकेशन सेक्टर मधील तत्ज्ञ व्यक्तीला नेमण्याचा अधिकार सरकारकडे असेल.आतापर्यंत TRAI मध्ये कधी खाजगी क्षेत्रातील व्यक्तीने अध्यक्षपद बजावले नाही.
 
इंडियन एक्स्प्रेस मधील बातमीच्या मजकुरानुसार,' या अध्यक्षपदाचे निकष अजून स्पष्ट झाले नाहीत.'असे TRAI चे एका अधिकाऱ्याने बोलताना सांगितले.खाजगी क्षेत्रातील ३ दशकांहून अधिक अनुभव असलेल्या व्यक्तीला हा पदभार मिळू शकेल.मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा तत्सम पदावर काम करणाऱ्याचा अनुभव यासाठी आवश्यक असेल.
 
यातील अजून अधिक माहिती माध्यमांसमोर आलेली नाही.
 
Powered By Sangraha 9.0