
JustMyRoots कंपनीने The State Plate चे अधिग्रहण केले
मुंबई:JustMyRoots या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने The State Plate (TSP) या नाशवंत नसलेल्या खाद्यपदार्थांची कंपनीचे अधिग्रहण ( Acquire) केले आहे.TSP ही २३ वर्ष जुनी कंपनी आहे. मुस्कान संचेती,राघव झावर यांनी ही कंपनी सुरू केली होती. JustMyRoots ने अधिग्रहण केले तरी मुस्कान, व राघव हे दोन्ही संस्थापक कंपनीसाठी कायर्रत असणार आहेत.TSP ने पुढील ३ वर्षासाठी १०० कोटींच्या उलाढालीचा ब्रँड म्हणून आपली ओळख निर्माण करायचे ठरवले आहे.
याविषयी बोलताना, ' JustMyRoots कायम इंटरसिटी फूड डिलिव्हरी साठी कटिबद्ध होती.हे अधिग्रहण आमच्या ध्येयाचे प्रतिक आहे असे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी समिरन सेनगुप्ता म्हणाले.
मुस्कान संचेती यांनी याविषयी बोलताना,' क्षेत्रीय फूड सेंगमेट हे सामुहिक क्षेत्रात मोडत नाही कुठल्याही फक्त एका ब्रँडची लोणचे, मसाले, खाद्यपदार्थ यात अस्तिव नाही.आम्ही या परिस्थितीचा आढावा घेत आम्ही आमच्या व्यवसायाचे बिझनेस मॉडेल निर्माण करू. ग्राहकांची नेमकी गरज ओळखून आम्ही या असंघटित क्षेत्रात आमचे उत्पादन लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.' असे म्हणाल्या.
जुलै २०२३ मध्ये प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी JustMyRoots मध्ये गुंतवणूक केली होती.