कृषी सहसंचालक विभागातील रिक्त जागांसाठी लवकरच अर्जप्रक्रिया सुरू होणार

12 Sep 2023 17:14:18
Joint Director Department of Agriculture Recruitment

मुंबई :
कृषी सहसंचालक विभाग, नागपूर येथील रिक्त जागा भरण्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहसंचालक विभागातील रिक्त जागा सरळसेवा भरतीने भरल्या जाणार आहेत. दरम्यान, राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर विभाग यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून भरण्याकरिता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

दरम्यान, या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करावयाचा असून अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ०३ ऑक्टोबर २०२३ असणार आहे. तर अर्जप्रक्रिया येत्या गुरूवारपासून म्हणजेच, दि. १४ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होईल. तसेच, उमेदवारास अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे. भरतीबाबत अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.



Powered By Sangraha 9.0