कृषी विभागात २१०९ रिक्त जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा

12 Sep 2023 18:38:24
Department of Agriculture Krishi Sevak Post

मुंबई :
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील हजारो रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, कृषी विभागात विविध जिल्हानिहाय जागा रिक्त आहेत. यासर्व जागा भरण्यासाठी भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. कृषी विभागात 'कृषी सेवक' म्हणून रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

दरम्यान, राज्यातील विविध जिल्हयासाठी कृषी सेवकांची नियुक्ती केली जाणार असून दि. १४ सप्टेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून दि. ०३ ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.  या भरतीमध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक,लातूर, औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश असून त्यासाठीच्या एकूण २१०९ कृषीसेवकांची भरती केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी राज्य शासनाच्या कृषी विभाग अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

ठाणे विभाग: कृषी सहसंचालक : २९४ रिक्त पदे

अमरावती विभाग: कृषी सेवक: २२७ रिक्त पदे

नागपुर विभाग: कृषी सहसंचालक: ४४८ रिक्त पदे

पुणे विभाग: कृषी सेवक: १८८ रिक्त पदे

नाशिक विभाग: कृषी सहसंचालक : ३३६ रिक्त पदे

औरंगाबाद विभाग: विभागीय कृषी सहसंचालक : १९६ रिक्त पदे

लातूर विभाग: कृषी सहसंचालक: १७० रिक्त पदे

कोल्हापूर विभाग: कृषी सहसंचालक: २५० रिक्त पदे


Powered By Sangraha 9.0