चित्राताईंनी ठाकरेंसाठी पाठवला विदुषकाचा ड्रेस!

    12-Sep-2023
Total Views |

Chitra Wagh  
 
 
मुंबई: जळगावमध्ये झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात चार ते पाच वेळा टरबुज्या असा शब्द वापरला. टरबुज्यासारखा माणून मी पाहिलेला नाही. पण तुम्ही म्हणत असाल तर ठिक आहे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टरबूजा म्हणून टीका केल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरेंसाठी विदुषकाचा ड्रेस पाठवला आहे.
 
 
 
 
चित्रा वाघ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक विदूषकही आणण्यात आला होता. चित्रा वाघ बोलत असताना हा जोकर मागे फिरत होता. स्वतःच्या सडलेल्या बुद्धीचा भोपळा बाहेर आणण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ना घर का ना घाट का? अशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झाली असल्याचा घणाघात चित्राताईंनी केला आहे.
 
त्या म्हणाल्या, "विदूषकांची टोळी राज्यात फिरतेय यात पहिले आहेत संजय राऊत, दुसरं आहे भास्कर जाधव आणि तिसरा विदूषक उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेकडे दुसरे काम उरल नाही म्हणून ते करमणूक करत आहेत. आमच्या नेत्यांच्या नादी लागू नका. तुम्ही आमच्या नेत्यांवर बोलाल पण यापेक्षा कडक उत्तर देऊ. उद्धव ठाकरे यांना गोध्रा दिसते. उद्धव ठाकरे हिंदू विरोधी झाले आता श्रीरामाबद्दल देखील ते बोलत आहेत. 370 हटवून दाखवलं हा पुरुषार्थ आहे. पण उद्धव ठाकरे यांचा पुरुषार्थ काय तर कोविड काळात भ्रष्टाचार, पत्राचाळ घोटाळा, यात आहे." असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.