छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पदभरती; अर्ज करण्यासाठी शेवटची संधी

12 Sep 2023 16:53:37
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Recruitment

मुंबई :
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत एकूण ११४ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

तसेच, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दि. १२ सप्टेंबर २०२३ असणार आहे. “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), लेखा परीक्षक (गट क), लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क), स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रमुख अग्निशामक, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ लेखा परीक्षक, अग्निशामक, लेखा लिपिक ” ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.

त्याचबरोबर अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून १८ ते ४५ वर्षे असणार आहे. या पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. तसेच, भरतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Powered By Sangraha 9.0