दिल्ली : नुकतीच दिल्ली येथे जी-20 परिषद पार पडली. त्यासाठी अनेक देशांतील प्रतिनिधी उपस्थित झाले होते. जी-20 परिषदेनंतर हे सगळे आपापल्या मायदेशी परतले. परंतु, कॅनडाचे पंतप्रधान मात्र अजूनही भारतातच अडकले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांच्या विमानात बिघाड आल्यामुळे त्यांना भारतातच थांबावे लागले आहे. ते रविवारी इथून आपल्या मायदेशी परतणार होते परंतू, त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड आला आणि ते दिल्लीत अडकून पडले आहेत.
मात्र, आता पंतप्रधान जस्टीन टुडो यांच्याकरिता कॅनडातून विमान मागवण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी हे विमान भारतात पोहोचणार असून सायंकाळी जस्टीन टुडो आपल्या शिष्टमंडळासह कॅनडाला रवाना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच जस्टीन टुडो यांचे विमान दुरुस्त करण्यासाठी एक तंत्रज्ञ येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जस्टीन टुडो यांना नेण्यासाठी सीसी CC-150 पोलारिस विमान येणार आहे. हे अनेक सुधारित एअरबस A310-300 पैकी एक आहे. कॅनेडियन सशस्त्र दल या विमानाचा उपयोग पंतप्रधान, गव्हर्नर जनरल आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या प्रवासासाठी हे विमान वापरले जाते.