भाजप करणार वंचितांना न्याय देण्याचे काम; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही

12 Sep 2023 19:58:34
BJP State President Chandrasekhar Bawankule On Vanchits

मुंबई :
''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली देश बनत असून आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक एक पाऊल आत्मविश्वासाने टाकत आहे . पंतप्रधान मोदी आणि विकासाचा ध्यास असलेले राज्यातील नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षांतील कार्यकर्त्यांचा ओढा भाजपकडे वाढला आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून वंचित समाजाचे प्रश्न मार्गी लावले जाणार आहेत. वंचितांना न्याय देण्याचे काम भाजपच करेल,'' अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

दि. १२ सप्टेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी भाजपत प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते. भाजप प्रदेश मुख्यालयात पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.


Powered By Sangraha 9.0