सामाजिक क्षेत्रात गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या ‘सेवा सहयोग फाउंडेशन’ने १४ वर्षं पूर्ण होऊन १५व्या वर्षांत पदार्पण केले. राज्यातील विविध ठिकाणी ‘सेवा सहयोग फाऊंडेशनचा १५वा वर्धापन दिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’च्या या वर्धापन दिन कार्यक्रमांचा घेतलेला हा धावता आढावा...
नवी मुंबई विभाग
दि. २ सप्टेंबर आणि आज खूपच आनंदाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे, आज खरं तर दोन संस्थांनी आपली वाटचाल पुढे नेण्याचा काम केलं आहे. प्रथम तर ‘इस्रो’ ज्यांनी २ तारखेला ’आदित्य एल-१’ लाँच करून सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी वाटचाल सुरू केली आणि दुसरी संस्था म्हणजे आपली ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ ज्यांनी १५वा वर्धापन दिवस साजरा केला. खरंच हा योगायोगच असेल, तर ‘इस्रो’ला आणि तसेच ‘सेवा सहयोग’चे खूप अभिनंदन. १५वा वर्धापन सोहळ्यानिमित्त दि. २ सप्टेंबर, संध्याकाळी ५ वाजता, भारतीय विद्या भवन, वाशी येथे आयोजित करण्यात आला होता.
‘१४ वर्षं’ हा शब्द दोन शब्दांमध्ये बोलता येतो व छोटा आहे. पण, १४ वर्षं हा कालावधी खूप मोठा आहे. आजचा कार्यक्रम करताना मान वर करून, खांदा ताठ व अभिमानाने सर्वजण आपले मनोगत मंचावर व्यक्त करीत होते. आज सर्व कार्यकर्त्यांना आपल्या सेवा कामाचा खूप अभिमान वाटत होता.
आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सुधीरजी पटेल, अंजलीताई गांगल, मयूर गांगुरडे, चार्ल्स विलियम, संकेतजी गोडबोले, सुरेशजी जोशी हे वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये विविध शाळेतील मुख्याधापक, शिक्षक, संस्थेचे प्रमुख, दाते, स्वयंसेवक आपल्या सोहळ्यानिमित्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवयानी खेडेकर ताईंनी अतिशय सुंदररित्या केले. यावेळी ‘सेवा सहयोग’ची प्रास्ताविक सांगून व्हिडिओद्वारे प्रवास दाखविण्यात आला. ‘सेवा सहयोग’अंतर्गत नवी मुंबईमध्ये चालणार्या विविध प्रकल्पांचे लाभार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले.
पालघर विभाग
कार्यक्रमात बोलताना ममता सगणे म्हणाल्या की, “मी चूल आणि मूल इतकेच पाहणारी एक गावातली महिला होते. पण, ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’च्या सहकार्य आणि मदतीमुळे मी शेती करायला लागले, लाडू वळून ते विकण्याचा व्यवसाय करू लागले. आज व्यासपीठावरून मी ज्या आत्मविश्वासाने बोलतेय. तो मला या संस्थेमुळे मिळाला!”
दि. ३ सप्टेंबर रोजी बोईसर येथील संजय हेगडे कौशल्य विकास केंद्रात संपन्न झालेला ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’चा वर्धापन दिन सोहळा, अशाच एकाहून एक श्रवणीय अनुभव कथनांनी सजला होता! कार्यक्रमासाठी सुरेश नायक आणि पालघर जिल्ह्यात काम करणारे संस्थेचे सर्व कार्यकर्ता, अभ्यासिका शिक्षक, किशोरी वर्गप्रमुख आणि गावागावांतील युवा स्वयंसेवक असे एकूण ६० जण उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात ४०हून अधिक लोकांनी आपला संस्थेसोबतचा आजवरचा प्रवास आणि अनुभव कथन केले.
ठाणे विभाग
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड त्याचबरोबर संस्थेचे संचालक किशोर मोघे आणि रवी कर्वे उपस्थित होते. कार्यक्रमात किशोरी विकास प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर केली. त्यानंतर ‘मणकर्णिक’ अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासिका प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी जोशी यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय डॉ. अंजली गांगल यांनी करून दिला. संस्थेच्या आजवरच्या कामांची माहिती यावेळी आकाश गुप्ते यांनी उपस्थितांना दिली.
बदलापूर विभाग
‘सेवा सहयोग फाउंडेशन’, बदलापूर विभाग दि. २७ ऑगस्ट रोजी बदलापूर विभागात सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये ‘सेवा सहयोग फाउंडेशन’चा वर्धापनदिन यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये ८८ लोकांचा आणि दहा (डडऋ) कार्यकर्त्यांचा एकूण ९+८ जणांचा सहभाग होता. सदर कार्यक्रमामध्ये शिक्षण, पर्यावरण आणि समाजप्रबोधन करणार्या लोकांचा सहभाग जास्त होता.
मुंबई विभाग
दि. २ सप्टेंबर रोजी १५व्या वर्धापन दिनाचा सोहळा अंधेरी येथे संपन्न झाला. ‘सेवा सहयोग’ने गरीब आणि वंचित लोकांच्या सामाजिक कार्यासाठी १४ वर्षे पूर्ण केली आहेत. याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, समुपदेशन आणि भविष्यातील दृष्टिकोनासाठी मार्गदर्शन करून मदत केली आहे. हे महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहे आणि बरेच काही. अभ्यासिका विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम नृत्य, गायन सादर केले, ‘सेवा सहयोग’ सोबत त्यांचे अनुभव सांगितले.
कर्जत विभाग
दि. १० सप्टेंबर रोजी ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’चा १५वा वर्धापनदिन सोहळा अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलननाने होऊन गणेश वंदना आणि पेटीच्या सुरांबरोबर स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत जोरदार झाले. त्यानंतर विशालजी हळदवणेकर यांनी ‘सेवा सहयोग’चा १४ वर्षांचा प्रवास अतिशय छान कथन केला. त्यानंतर संघमित्रा किशोरी वर्गाच्या मुलींनी पथनाट्य सादर करून उपस्थितांना तरुणाईमध्ये घडत असलेल्या स्वार्थी प्रेमापासून सावध राहण्याचा आणि त्याला आळा घालण्याचा संदेश दिला.त्यानंतर मुलींनी लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर केले. तन्मय फुलावरे, जय हनुमान अभ्यासिका याने ‘सेवा सहयोग’तर्फे घेण्यात येणार्या अभ्यासिकांमुळे होणारे फायदे कथन केले व उपस्थितांची मने जिंकली. यानंतर स्वयंसेवक धनंजय पवार, राजिप शाळा तिवरे मुख्याध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रमुखांचा आपल्याला घडवण्याचा प्रवास वर्णन केला. सदरील कार्यक्रमास ‘सेवा सहयोग’ कार्यकर्ते अभिनव शाळेचे खजिनदार, शिक्षक, ‘मैत्रिबोध संस्थे’च्या अनुराधा भाटकर, अभिनव महाविद्यालयातील ‘एनएसएस’चे विद्यार्थी, लक्ष्मीकांत वाचनालयाचे पदाधिकारी, कर्जत विभागातील विद्यार्थी, पालक, स्वयंसेवक तसेच सर्व अभ्यासिका प्रमुख किशोरी प्रमुख आदी उपस्थित होते.
किशोर मोघे
(लेखक ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’चे संचालक आहेत.)