‘कृषी वैज्ञानिक भरती मंडळ’ मध्ये ३६८ पदांसाठी भरती

12 Sep 2023 19:13:31
Agricultural Scientist Recruitment Board

मुंबई :
‘कृषी वैज्ञानिक भरती मंडळ’मधील रिक्त जागांसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. ‘कृषी वैज्ञानिक भरती मंडळ’मधील रिक्त असलेल्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 'एएसआरबी' म्हणजेच कृषी वैज्ञानिक भरती मंडळ अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामध्ये विविध पदांच्या ३६८ जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

दरम्यान, ‘कृषी वैज्ञानिक भरती मंडळ’मधील प्रधान शास्त्रज्ञ, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पदांच्या एकूण ३६८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून १५ सप्टेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तसेच, उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 

पदाचे नाव आणि पदसंख्या:

प्रधान शास्त्रज्ञ - ८० जागा

ज्येष्ठ शास्त्रज्ञ - २८८ जागा

एकूण रिक्त जागा - ३६८

Powered By Sangraha 9.0