अजितदादा गटातील २४ आमदारांवर होणार कारवाई!

- शरद पवार गटाची मागणी

    12-Sep-2023
Total Views |
 
Pawar
 
 
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाकडुन करण्यात आली आहे. २ सप्टेंबर रोजी शरद पवार गटाच्या शिस्तपालन समितीची बैठक पार पडली त्या बैठकीत २४ आमदारांची नाव ही कारवाईसाठी निश्चित करण्यात आली आहे. हे २४ आमदार अजित पवार गटातील असून ज्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे.
 
२४ आमदारांची यादी देखील तयार करण्यात आली आहे. संबंधित २४ आमदारांना ही यादी आणि पत्र पाठवण्यात आले आहे. या २४ आमदारांमध्ये विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांचा समावेश समावेश असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार गटातील या सर्व २४ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे.