पुष्पा २ चित्रपट ‘या’ दिवशी येणार भेटीला

11 Sep 2023 20:30:22
 
pushpa 2
 
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांची सध्या प्रेक्षकांना भूरळ पडली आहे. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली होतीच. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या पुष्पा या चित्रपटाचा सिक्वेल कधी येणार याची चाहते वाट पाहात होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून 'पुष्पा २' चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट २०२४मध्ये प्रदर्शित करण्यात येणार असून स्वांतत्र्यदिनाचा मुहुर्त निश्चित करण्यात आला आहे.
 
 
 
‘पुष्पा’ चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकेसोबतच यातील संवाद आणि गाणी देखील प्रचंड गाजली. तसेच, या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा ‘पुष्पा २’ मधून अल्लू प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटात अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना, फहद फॉसिल या कलाकारांच्या मुख्य भूमिका असून काही दिवसांपूर्वीच रश्मिकाने ‘पुष्पा २’च्या सेटवरील फोटो शेअर केला होता. १५ ऑगस्ट २०२४ या दिवशी ‘पुष्पा २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पुष्पा २’च्या निर्मात्यांकडून ट्वीट करत याबाबत माहिती देण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0