ग्रामीण भागातील वास्तव सांगणारा 'खळगं' लवकरच येणार भेटीला....

    11-Sep-2023
Total Views |
 
khalag
 
 
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आशयघन कथानक, बोलीभाषा यांवर भर देणारे चित्रपट अधिक दिग्दर्शित केले जात असल्याचे दिसून येत आहे. मुख्य म्हणजे या सर्व बाबींसोबतच कलाकारांचा दमदार अभिनय या सगळ्याच गोष्टींचा सांगोपांग विचार करत चित्रपट पाहावा की नाही हे प्रेक्षकवर्ग ठरवतात. अशातच थरारक, रहस्यमय विषयावर भाष्य करणाऱ्या व सत्य परिस्थितीचं दर्शन घडवणाऱ्या 'खळगं' या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे.
 
नवोदित कलाकारांना घेऊन केलेली ही आखणी प्रेक्षकांना भावुक करणारी आहे. पोलीस होण्याची उमेद, त्यासाठीची एका आई लेकाची सुरू असलेली धडपड, एकीकडे प्रेमासाठीचा त्याग हे सगळं हुबेहूब या ट्रेलरमधून पाहायला मिळतंय. नवोदित कलाकारांनी केलेला अभिनय हा खरंच वाखाणण्याजोगा आहे. गावखेड्यातील व सत्यघटनेवर आधारित 'खळगं' नव्या कोऱ्या चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता वाढवून ठेवली आहे.
 
अनाथ मुलांच्या अंतर मनाची व्यथा सांगणाऱ्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी पेलवली आहे. 'कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट' प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा 'कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट'सह निर्माते गोवर्धन दोलताडे, सुरेश तांदळे, रोहन पाटील यांनी सांभाळली आहे. तर सहनिर्माते म्हणून लिला डेव्हलपमेंट, अनुराधा किसनराव नजनपाटील यांनी बाजू सांभाळली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद शिवाजी दोलताडे, गोवर्धन दोलताडे यांचे असून चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सचिन अवघडे यांनी उत्तमरीत्या साकारली आहे.
 
गावखेड्यात चित्रित झालेल्या आणि वास्तविकतेचं दर्शन घडवणाऱ्या या आशयघन चित्रपटात नवोदित कलाकारांनी चांगलाच कल्ला केला. माधवी जुवेकर , कार्तिक दोलताडे , सुलतान शिकलगार , रोशनी कदम , प्रज्वल भोसले , प्रितम भंडारे , कल्यानी पवार, शिवाजी दोलताडे ,माणिक काळे , वैष्णवी मुरकुटे , ज्वालामुखी काळे , भैरव जाधव , संकेत कवडे , शिल्पा कवडे , मयूर झिंजे , मोहन घोलप , मंगेश ससाणे , ऐश्वर्या लंगे , गणेश शिंदे , शरद पवार या कलाकारांनी चित्रपटात उत्तम अभिनय साकारला आहे. येत्या २२ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.