मुंबई : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन मंगळवेढा येथे होत आहे. साहित्य परिषद दामाजीनगरच्या वतीने हे संमेलन होत आहे. अध्यक्षपदी अरुण म्हात्रे यांची निवड सर्वानुमते करण्यात आलेली आहे. यावेळी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे हे स्वागताध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक झाली व त्यात अध्यक्ष पदासाठी अरुण म्हात्रे याच्यावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच २ व ३ डिसेम्बर या तारखा संमेलनासाठी निश्चित करण्यात आल्या.
मंगळवेढ्याचा समृद्ध संतपरंपरा लाभली आहे. या गावात संत चोखामेळा, संत कान्होपात्रा आणि संत दामाजी यांची समृद्ध साहित्य परमोपरेचा वारसा आहे. संमेलनात त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात येईल.