ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या मुलाचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

11 Sep 2023 15:53:41

narkar family
 
 
मुंबई : मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांच्या मुलांनी अभिनय, निर्मिती किंवा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. गेली अनेक वर्ष नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी सुप्रसिद्ध जोडी म्हणजे अविनाश आणि ऐश्वर्या नारकर. ९० च्या काळापासून ही जोडी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. आजही समाज माध्यमातील आधुनिकता स्वीकारत ही कायम प्रेक्षकांच्या संपर्कात राहते. या एव्हरग्रीन जोडीच्या लेकाने आता कलाविश्वात दिग्दर्शन म्हणून पदार्पण केले आहे.ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा मुलगा अमेय नारकर याने व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा हाती घेतली आहे. ऐश्वर्या नारकर यांनीच याविषयीची पोस्ट शेअर करत माहिती दिली.
 
काय आहे ऐश्वर्या नारकर यांची पोस्ट?
 
सावधान रहा! सतर्क रहा !! इन्स्पेक्टर.... मागावर आहेत!!! पण कोणाच्या मागावर आहेत? ते कळेल रविवारी १७ सप्टेंबरला संध्याकाळी ६ वाजता भरत नाट्य मंदिर, पुणे इथे.... आजकल प्रस्तुत खरा इन्स्पेक्टर मागावर, असं कॅप्शन देत ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या लेकाच्या नव्या नाटकाची माहिती चाहत्यांना दिली.
 
 

aishweya narkar
 
दरम्यान, आजकल प्रस्तुत ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. टॉम स्टॉपार्ड यांच्या ‘द रिअल इन्स्पेक्टर हाऊंड’ या एकांकिकेवर आधारित हे नाटक असून या नाटकाचं दिग्दर्शन अमेय नारकर करणार आहे.
Powered By Sangraha 9.0