उद्धव ठाकरेंच्या भाषेमुळे भाजप कार्यकर्त्यांचा संयम सुटेल!

चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा : उद्धव ठाकरेची भाषा कायदा सुव्यवस्था बिघडविणारी

    11-Sep-2023
Total Views |

bavankule 
 
मुंबई : उद्धव ठाकरे हे भाजपा नेत्यांवर करत असलेल्या टिकेमुळे भाजपा कार्यकर्ते त्यांचा संयम कधी सोडतील सांगता येत
नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन ढासळू लागले असून ते आता राजकारणाच्या मर्यादा देखील पाळू शकत नाहीत. त्यांची भाषा राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडविणारी आहे. यापूर्वीही त्यांना याबाबत सूचित केले आहे. मात्र वारंवार त्यांची भाषा वाईट होत चालली. "
 
नागपूर येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते, राज्यात शांतता रहावी ही आमची इच्छा आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था बाधित करण्याचे ठरविले आहे, असे सांगून श्री बावनकळे म्हणाले, कुणबी-मराठा हे भावासारखे राहतात. त्यामुळे दोन भावांत वाद निर्माण करणे चुकीचे आहे. याबाबतीत सरकार योग्य तो निर्णय घेईल.
 
उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना विकासाची चर्चा करायचीच नाही, केवळ आरोप करायचे आहेत. काँग्रेसचे जनतेत संभ्रम निर्माण करणे हेच त्यांचे काम आहे. त्यांना जनता धडा शिकवेल, असेही श्री बावनकुळे म्हणाले.
 
• राहुल गांधींचे विदेश दौरे संशोधनाचा विषय!
राहुल गांधी दर महिन्याला विदेशात का जातात, हा संशोधनाचा विषय आहे. पुढच्या वेळी विदेश दौऱ्यावर जातील, तेव्हा त्यांनी त्यांच्या विदेश दौऱ्याविषयी १४० कोटी भारतीयांना माहिती द्यावी, असेही बावनकुळे म्हणाले. आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.