मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून यानिमित्ताने कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कशेडी बोगद्याची एक लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना मोठा दिलासा यामुळे चाकरमान्यांना मिळणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भात आढावा घेतला होता. त्यांनी सांगितले होते की, येत्या काही दिवसांत म्हणजेच गणेशोत्सवाच्या पूर्वीच कशेडी बोगद्याची एक लेन सुरू करण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू आहे.
एकंदरीत, मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील लेनसंबंधित घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली असून अखेर आज एक लेन सुरु झाली आहे. त्यामुळे कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या कोकणकरांना खासगी वाहनाने कमी वेळेत अंतर कापता येणार आहे.