मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे लवकरच आठ पदरी होणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राज्य सरकारला प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर होणारी वाहतूक कोंडी पाहता हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, खासगी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेता महाराष्ट्र सरकारकडून या प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्तब केले जाईल. तसेच, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आलेल्या प्रस्तावामुळे एक्सप्रसे वे वरील वाहतुककोंडी टळण्याची शक्यता आहे.
एकंदरीत, महाराष्ट्र राज्य शासनाकडून हा प्रस्ताव लगेच मंजूर झाल्यास एका वर्षाच्या आत प्रस्तावित काम सुरू करण्यात येऊ शकते. त्यामुळे या एमएसआरडीसीकडून देण्यात आलेल्या प्रस्तावावर राज्य शासन काय भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.