MahaMTB Exclusive: इंडियाचा 'भारत' स्वीकार: आर्थिक परिणामांचे अनावरण - अक्षत खेतान

11 Sep 2023 16:23:35
Akshay Khetan
 
 
MahaMTB Exclusive:  इंडियाचा 'भारत' स्वीकार: आर्थिक परिणामांचे अनावरण -  अक्षत खेतान

भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीला प्रतिकात्मक चालना देण्याच्या पार्श्वभूमीवर विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंच तसेच द्विपक्षीय उपक्रमांत देश “ भारत ” हे नाव प्रचलित करण्यात सक्रिय झाला आहे. आपली मूळं किती खोलवर रूजली आहेत, याचे दर्शन या भावात घडते. शिवाय ते आर्थिक परिणामांचे द्योतक म्हणावे लागेल. भारताच्या रिब्रँडिंगमुळे स्थानिक उद्योगांचे पुनरुज्जीवन होते आहे. पारंपरिक हस्तकला, वस्त्रोद्योग आणि कलाविषयक मागणीत स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढ झाली आहे. “ मेड इन भारत ” हा आता अस्सलता, गुणवत्ता आणि सांस्कृतिक समृद्धतेचा टॅग ठरला आहे.पर्यटन उद्योगाला महत्त्वपूर्ण वेग मिळाला आहे. भारत हा शब्द स्वीकारताना या शब्दाला परिवर्तनाचा आवाज आहे, ज्यामुळे परदेशी पर्यटक आकर्षित झाला. परिणामी वारसा स्थळे, ऐतिहासिक स्मारके तसेच सांस्कृतिक महोत्सवांकडे ओढा वाढला.अगदी राज्यांतील पर्यटन विभागांन “ एक्सपिरिअन्स भारत ” (भारत अनुभवा) संकल्पना अधोरेखित करणारी अभियानं जारी केली आहेत.
 
नामबदल हा केवळ सांस्कृतिक निर्णय नसून धोरणात्मक तसेच आर्थिक निर्णय आहे. भारताची जागतिक ओळख, पारंपरिक शहाणपण आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाकरिता समानार्थी शब्द बनते आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय आता भारताकडे जुन्या पद्धती आणि आधुनिक कल्पकतेचा संगम म्हणून पाहतात. गुंतवणुकीची एक अभिनव संधी उपलब्ध करून देतात. भारताने द्विपक्षीय गुंतवणुकीत आपल्या प्राचीन नावाचा सक्रिय प्रचार केल्याने सांस्कृतिक मुत्सद्देगिरीची नवीन जाणीव निर्माण झाली आहे.अनेक देशांनी, या बदलाचे महत्त्व ओळखून, सकारात्मक प्रतिसाद दिला. अधिक सखोल सांस्कृतिक आणि आर्थिक भागीदारीसाठी सुसंधी चालून आलेल्या आहेत.तंत्रज्ञान क्षेत्राच्या नजरेतून हा नामबदल सुटला नसून ‘ भारत ’ हा शब्द आपल्या ब्रॅंडिंगमध्ये समाविष्ट करून घेण्याची सुरुवात झाली आहे. या रिब्रॅंडिंगला अत्याधुनिक नावीन्यपूर्णतेसह पारंपरिक मूल्यांची जोड असून गजबजलेल्या वैश्विक तंत्रज्ञान परिघात एका ताज्या दृष्टिकोनाचा प्रस्ताव सादर करत आहे.
 
 
तरीच या बदलापुढे आव्हानांची कमतरता नाही. आपल्याकडे आर्थिक असमतोल आणि रचनात्मक समस्या खोलवर रुजलेल्या असून त्यांचे उच्चाटन शक्य नाही असा वाद काही समीक्षक घालतात.सांस्कृतिक ओळख निर्माण करणे महत्त्वपूर्ण आहेच, मात्र आर्थिक सुधारणा तसेच सर्वसमावेशक विकास धोरणांची गरज दुर्लक्षित करून भागणार नाही यावर ते जोर देतात. सरतेशेवटी निघणारा निष्कर्ष, इंडिया ते भारत हा प्रवास अतिशय प्रतिकात्मक आहे, त्याचे आर्थिक परिणाम मूर्त स्वरुपातील आहेत. प्राचीन अस्मिता आणि आधुनिक आकांक्षा यांचा हा समतोल येत्या काही वर्षांत देशाच्या आर्थिक मार्गाला कसा आकार देतो ते भविष्यात स्पष्ट होईलच !
 
( लेखक हे प्रसिद्ध सल्लागार श्री अक्षय खेतान हे AU Corporate कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. AU कंपनी Corporate Restructuring and Corporate Advisory Services या सेवा पुरवतात )
 
Powered By Sangraha 9.0