स्टर्लिंग जनरेटर्सने, अधिक पर्यावरणपूरक भविष्यासाठी, आणले रेट्रोफिट एमिशन कंट्रोल डिव्हाइस

    11-Sep-2023
Total Views | 29
Sterling
 
 
स्टर्लिंग जनरेटर्सने, अधिक पर्यावरणपूरक भविष्यासाठी, आणले रेट्रोफिट एमिशन कंट्रोल डिव्हाइस


मुंबई :स्टर्लिंग जनरेटर्स प्रायव्हेट लिमिटेड (एसजीपीएल) ह्या स्टर्लिंग अँड विल्सन ग्रुपमधील कंपनीने तसेच भारतातील आघाडीच्या जनित्रसंच (जेनसेट) उत्पादक कंपन्यांपैकी एकीने, आज, आपल्या रेट्रोफिट एमिशन कंट्रोल डिव्हाइस (आरईसीडी) हे नवोन्मेषकारी शुद्ध हवेचे उपकरण, बाजारात आणले.पीआय ग्रीन इनोव्हेशन्ससह कंपनीने हे उपकरण बाजारात आणले आहे.आरईसीडी फिल्टर-लेस तंत्रज्ञानावर घडवण्यात आले आहे आणि इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेशनच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित आहे.हे उपकरण इंजिनाच्या एग्झॉस्टमधील (पार्टिक्युलेट मॅटर अर्थात पीएम) 70 टक्के अधिक कार्यक्षमतेने पकडते.
 
स्टर्लिंग जनरेटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ श्री. संजय जाधव ह्या उत्पादनाबद्दल म्हणाले, “पीआय ग्रीन इनोव्हेशन्ससोबत त्यांच्या आरईसीडी तंत्रज्ञानासाठी सहयोग केल्याचा आम्हाला आनंद वाटतो.आम्ही ग्राहकांना देऊ करत असलेल्या उत्पादनांचा विस्तार व त्यात सुधारणा करण्याची उत्तम संधी ह्या सहयोगामुळे प्राप्त झाली आहे.नव्याने बाजारात आणलेले आरईसीडी हवेचा दर्जा सुधारण्याचे काम अत्यंत कार्यक्षमतेने करते आणि ग्राहकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार पीएमसंदर्भातील अटींची पूर्तता करण्यासाठी एक व्यवहार्य साधन पुरवते.”
 
“पर्यावरणाची शाश्वतता ही सर्वांची जबाबदारी ह्यावर स्टर्लिंग जनरेटर्सचा गाढ विश्वास आहे आणि आमच्या ग्राहकांसाठी व पृथ्वीसाठी अधिक कार्यक्षम, अधिक पर्यावरणपूरक उत्पादने शोधण्यातील आमचे समर्पण ह्या सहयोगातून दिसून येते. उद्योगक्षेत्राच्या वायू प्रदूषणावर मात करण्याच्या पद्धतीला, पीआय ग्रीन इनोव्हेशन्सच्या साथीने,नवीन स्वरूप देण्याचे तसेच पर्यावरणपूरक ऊर्जा उत्पादनांचे नवीन मापदंड स्थापन करण्याचे,ध्येय आमच्यापुढे आहे,” असे ते म्हणाले.
 
डीजी एग्झॉस्ट (मफलर/सायलेन्सर) बसवून झाल्यानंतर आरईसीडी स्थापित केले जाते आणि त्यासाठी इंजिन/डीजी ह्यांत कोणताही बदल करण्याची आवश्यकता भासत नाही.ह्या तंत्रज्ञानाचे वेगळेपण म्हणजे ह्यात विलग केलेल्या सुक्ष्म कणांचे/बाय प्रोडक्ट्सचे रूपांतर करण्याची आणि लेजर प्रिण्टर्स व कॉपीयर्ससाठी लागणाऱ्या पेण्ट्स,डाइज व टोनर्सचा उच्च मूल्याचा कच्चा माल म्हणून पुनर्वापर करण्याची क्षमता आहे.हे विलगीकृत सुक्ष्म कण रबरावर केल्या जाणाऱ्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेतही वापरले जातात. त्यामुळे त्यांची वेगळी विल्हेवाट लावण्याची गरज भासत नाही किंवा त्या कणांमुळे दुय्यम स्वरूपाचे प्रदूषणही होत नाही.हे उत्पादन सर्व हवामानांना अनुकूल आहे.त्याची फार देखभाल करावी लागत नाही.त्याची बांधणी सुलभ,कार्यक्षम व मजबूत आहे.त्यामुळे ते सातत्याने काम करत राहते आणि दीर्घकाळ चालते.
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121