मृतदेहांच्या पिशव्यांचा गैरव्यवहार अंगलट, किशोरी पेडणेकर चौकशीला हजर

11 Sep 2023 14:45:06
 
Pednekar
 
 
मुंबई: महापालिकेत कोविड काळात मृतदेहाच्या बॅग खरेदी प्रकरणात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या संदर्भात किशोरी पेडणेकर आर्थिक गुन्हे शाखेसमोर आज उपस्थित होत्या.
 
या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने किशोरी पेडणेकर यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने किशोरी पेडणेकर यांना ४ आठवडे अटकेपासून संरक्षण दिलं आहे. मात्र, ११, १३ आणि १६ तारखेला किशोरी पेडणेकर यांना आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर रहावं लागणार आहे.
 
कोविड काळात मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या रुग्णालयांसाठी मृतदेहांच्या बॅग खरेदी करताना १८०० रुपयांची एक बॅग ६८०० रुपयांना विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0