मुंबई : आशिया कपच्या सुपर फोर अंतर्गत चाललेल्या भारत आणि पाकिस्तान या तिसऱ्या सामन्याचा पहिला डाव संपला असून भारताने २ गडी गमावत ३५६ धावा केल्या आहेत. या धावांसाठी विराट कोहली आणि के एल राहूल या दोघांत झालेली पार्टनरशिप निर्णायक ठरली. विराट कोहली आणि के एल राहूल या दोघांनी वैयक्तिकरित्या अनुक्रमे नाबाद १२२ आणि १११ धावा केल्या.
दरम्यान, दि. १० सप्टेंबर रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर सुरू झालेल्या सामन्यात पावसाचे व्यत्यय आल्याने सामना राखीव दिवशी खेळविण्यात आला. त्यानुसार, भारताने नाणेफेक जिंकत २ बाद ३५६ धावा केल्या. रोहित शर्मा ४९ चेंडूत ५६ धावांची खेळी केली त्यात ४ षटकार आणि ६ चौकार यांचा समावेश होता. तर गिलेन ५८ धावांची खेळी केली.
विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीतलं ४७ वं शतक साजरं केलं. सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी आणखी २ शतकांची गरज आहे. त्याचबरोबर विराट कोहली आणि के एल राहूल या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी २३३ धावांची विक्रमी भागिदारी केली. दरम्यान, भारताने ३५६ धावांचे तगडे आव्हान पाकिस्तानला दिले आहे.