मुंबई : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत 'ICAR- NBSS & LUP' नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे, या भरतीच्या माध्यमातून प्रोग्रामर-कम-आयटी तज्ञ, सीनियर प्रोजेक्टसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहयोगी, ज्युनियर प्रोजेक्ट असोसिएट, प्रकल्प सहाय्यक (I आणि II) आणि लॅब अटेंडंट या पदांसाठी थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत.
दरम्यान, 'ICAR- NBSS & LUP'मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीत ICAR- NBSS आणि LUP, प्रादेशिक केंद्र, कोलकाता यांना "जमीन" प्रकल्पासाठी खालील अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. तसेच, अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे, दि. २५-२९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०९ वाजता वॉक इन मुलाखती घेतल्या जातील.