मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सूरू केलं आहे. आज उपोषणाचा १४ वा दिवस आहे. या पार्श्वभुमीवर मराठा आरक्षणावर सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बोलावण्यात आली आहे. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात आजची बैठक घेण्यात येणार आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेणार. असं फडणवीस म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. सर्वांनी मिळून यावर तोडगा काढावा, त्यात राजकारण आणू नये. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आजची बैठक आहे. आरक्षण कायद्याच्या चौकटीतही बसायला हवं. ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसींना विनंती आहे की, गैरसमज करुन घेऊ नये. जरांगेच्या मागण्यांवर आजच्या बैठकीत विचार होईल. दोन समाज समोरासमोर यावेत असा कुठलाही निर्णय सरकार घेणार नाही." असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.