रुग्णाचे विश्लेषण आणि समन्वय (भाग-१८)

    11-Sep-2023
Total Views |
Article On Homeopathic Treatment And Analysis

डॉ. हॅनेमान आपल्या ‘ऑरगॅनॉन ऑफ मेडिसिन’मध्ये ९०व्या परिच्छेदात माणसाच्या निरोगी स्थितीबद्दल भाष्य करतात. ते लिहितात की, “माणसाच्या निरोगी स्थितीमध्ये शरीरातील अदृश्यपण, आत्मासदृश, गतिशील चैतन्य शक्ती ही भौतिक शरीराची अधिपती असते व ही चैतन्य शक्ती संपूर्ण शरीर व त्याच्या अवयवांचे कार्य पूर्णपणे नियंत्रित करून निरोगी पद्धतीने चालू ठेवते. त्याचप्रमाणे प्रत्येक अवयवाचे नियोजित कार्य व संवेदना यांचाही निरोगी पद्धतीने मेळ साधते.

यामुळे आपले सदसद्विवेकबुद्धी तरतमभान व शोधक शक्ती असलेले मन व बुद्धी निरोगी राहते व पर्यायाने संपूर्ण मन व शरीराचा मेळ साधून मनुष्य जगण्याचे उच्चतम ध्येय साध्य करू शकतो. याच धर्तीवर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनीसुद्धा काही ओळी लिहिल्या आहेत-

Thou hast made me endless, such is thy pleasure.
This frail vessel thou emptiest again and again,
and fillest it ever with fresh life.
This little flute of a reed thou hast carried over hills and dales,
and hast breathed through it melodies eternally new.
At the immortal touch of thy hands my little heart
loses its limits in joy and gives birth to utterance ineffable.
Thy infinite gifts come to me only on these very small hands of mine.
Ages pass, and still thou pourest,
and still there is room to fill.
गुरुदेव टागोरांच्या या वाक्यांचा अभ्यास केला, तरीसुद्धा हेच लक्षात येते की, माणसाचे शरीर व मन हे पूर्णपणे चैतन्यशक्तीच्या ताब्यात असते. जोपर्यंत ही चैतन्यशक्ती कार्यरत असते, तोपर्यंत या शरीराला व मनाला अर्थ आहे.

चैतन्यशक्ती विरहित शरीर व मन म्हणजेच आत्म्याविना शरीर म्हणूनच या चैतन्यशक्तीला काही विचारवंत आत्मासुद्धा म्हणतात. ही चैतन्यशक्ती जेव्हा शक्तिशाली असते, तेव्हा आपोआपच शरीराची ऊर्जा चांगली आपोआपच मनातील उमेद व ऊर्जासुद्धा चांगली असते व काहीतरी चांगले कार्य करण्याची इच्छा माणसाला होत असते. शरीराला व मनाला कुठलेही बंधन नसते. या बंधमुक्त स्थितीलाच ‘निरोगी स्थिती’ म्हणतात.

आता ही बंधन मुक्तता म्हणजे स्वैराचार नव्हे, बंधन मुक्तता म्हणजे सदसद्विवेकबुद्धी जागृत होऊन जे चांगले कार्य आहे, ते कुठल्याही बंधनाशिवाय करणे. यालाच ‘निरोगी स्थिती’ असे म्हटले जाते. या निरोगी स्थितीमध्ये शरीर व मनाची पूर्ण ‘कॅपेसिटी’ वापरण्याची ऊर्जा असते. ही शरीराची क्षमता पूर्णपणे वापरण्याची स्थिती असते. शरीर व मनाकडून १०० टक्के देण्याची स्थिती असते. या स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा कुठल्याही प्रकारची ‘बॉल्क’ नसतो.

ज्यावेळी ही चैतन्यशक्ती कमकुवत होते, ज्याला अनेक बाह्य व अंतर्गत कारणे असू शकतात. त्यावेळी या शरीर व मनाची बंधनमुक्त स्थिती निघून जाते व तो बंधनात अडकतो. या बंधनाच्या स्थितीलाच ‘रोगकारक स्थिती’ असे म्हणतात. आता आपण ही रोगकारक स्थिती कशी येते, ते पाहूया. (क्रमश:)

डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.