चाकरमान्यांसाठी खुशखबर! सणासुदीच्या वेळी अधिक शुल्क आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर आरटीओ करणार कारवाई

10 Sep 2023 12:39:00

rto


मुंबई :
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकडून अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर नवी मुंबई आरटीओ कारवाई करणार आहे. एवढंच नाही तर खासगी ट्रॅव्हल्सने किती दर आकारावेत याचे दरपत्रकही जारी केले आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांच्या खिसेकापीला ब्रेक लागणार आहे.

गणेशोत्सवासाठी अनेकजण कोकणात गावी जाण्याचे नियोजन करतात. यासाठी ४/५ महिन्यापासून तिकीट बुकिंगला सुरूवात होते. रेल्वेच्या वाढत्या गर्दीमुळे अनेकजण खासगी ट्रॅव्हल्सचा मार्ग निवडतात. परंतु, खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासासाठी थोडे थोडके पैसे नाही तर जवळपास दुप्पट पैसे मोजावे लागतात.
 
या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सने किती दर आकारावेत याचे दरपत्रकही नवी मुंबई आरटीओने जारी केले आहे. कोकणवासींसाठी प्रवास सुलभ व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्यांना बुकिंग मिळालं नाही किंवा ज्यांच्याकडे जाण्याची काही सोय नाही अशा लोकांसाठी ही व्यवस्था शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

Powered By Sangraha 9.0