उबाठा गटाला मोठा धक्का; 'या' मोठ्या नेत्याने दिला राजीनामा!

10 Sep 2023 17:00:20


gholap babanrao

मुंबई : उबाठा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे सध्या जळगावच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी राजीनामा दिला आहे. बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंना व्हॉट्सअॅपद्वारे राजीनामा पाठवला आहे.
 
शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंकडून पाच वेळा आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांना शिर्डी मतदार संघातून लोकसभेच्या उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले होते. घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्कप्रमुख नेमून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या.

मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे यांची संपर्कप्रमुख पदी निवड केली. त्यामुळे वाकचौरेंना लोकसभेचे तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. याच नाराजीतूनच बबनराव घोलप यांनी राजीनामा दिला असावा अशी चर्चा राजकीय वर्तूळात होत आहे.

Powered By Sangraha 9.0