मुंबई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत रत्नागिरीत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. रत्नागिरी येथे भरतीच्या माध्यमातून १०० जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान, रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेत “संसाधन व्यक्ती” या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.
तसेच, “संसाधन व्यक्ती” या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा असून दि. २५ सप्टेंबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे. अर्ज करण्याची पध्दत ऑफलाईन असून उमेदवाराने आपला अर्ज उपजिल्हाधिकारी (रोहयो) रोजगार हमी योजना शाखा जिल्हा रत्नागिरी, या पत्त्यावर पाठवायचा आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे १८ ते ५० वर्षेदरम्यान असावे.
भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
जाहिरात पूर्ण वाचावी.